नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी सुधाकर उर्फ काकासाहेब नारायणराव नरवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांची निवडणूक
माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली दि.१८ जून रोजी बिनविरोध झाली होती.
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांचे अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा मंगळवार दि.३० जून रोजी ११ वाजता कारखाना अतिथीगृहात संपन्न झाली.
अध्यक्ष पदासाठी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील व उपाध्यक्ष पदासाठी सुधाकर नारायणराव नरवडे यांचे एक-एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,माजी आ.पांडुरंग अभंग,राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार,
संचालक पंडितराव भोसले,डॉ.नारायण म्हस्के,जनार्धन कदम,अशोकराव मिसाळ, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी,अड.हिम्मतसिंह देशमुख,
अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, सौ.सुमनबाई काळे,सौ.रंजना तानवडे
साहाय्यक निवडणूक अधिकारी देविदास घोडेचोर, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सरव्यवस्थापक रविंद्र मोटे उपस्थित होते.


