भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे २४ वे पुण्यस्मरण निमित्त उद्या बुधवार दि. ८ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज (श्रीक्षेत्र आळंदी देवाची) यांचा कीर्तन सेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी
संचालक अनिल शेवाळे यांनी दिली.
ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, माजी आ. पांडुरंग अभंग व संचालक मंडळाचे उपस्थितीत श्रीसंत नागेबाबा भक्तनिवास भेंडा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


