Monday, August 10, 2026

व्हीओएम इंटरनॅशनल फोरमच्या राज्य कोअर कमिटीवर सुहास वेताळ

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटना (व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम)ची नूतन कार्यकारिणी परभणी येथील राज्यस्तरीय मेळाव्यात जाहीर करण्यात आली. या कोअर कमिटीवर अहिल्यानगर जिल्ह्यातून व्हॉईस ऑफ मीडियाचे सुहास वेताळ यांची निवड करण्यात आली आहे.
व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरमचा राज्यस्तरीय मेळावा व नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा परभणी येथे करण्यात आली. सध्या ७८ देशात कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या नूतन कोअर कमिटीचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व पदाधिकारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
या १४ जणांच्या कोअर कमिटीमध्ये जय भोसले (सिंधुदुर्ग), नागेश कल्याण (नायगाव), संजय बद्रापुरे (वसमत), गिरीश देशमुख (वसमत), सुहास वेताळ (भेंडा,नेवासा), रियाज मुल्ला (कोंडवा पुणे), रूपेश जाधव (नंदुरबार), दिलीप साळुंखे (नाशिक), गौतम वाघ (कल्याण), सय्यद सलीम (पुणे), कैलास निबोट (नागपूर लातूर), सोमनाथ पवार (सोलापूर), इर्शाद शेख (पुणे), रश्मी भदरगे (सेलू) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!