Thursday, August 20, 2026

मुळा उजव्या कालव्याचे उद्या पासून  आवर्तन सोडण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील मुळा उजव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून खरीप हंगामासाठी  उद्या शुक्रवारी दि.२१ ऑगस्ट २०२६ रोजी सांयकाळी ६ वाजे  पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली.

सद्य परिस्थितीत  पावसाला खंड पडून उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खालावल्याने शेतऱ्यांची पाणी सोडण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यासंदर्भात  आ. विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांची भेट घेवून खरीप पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.

त्यानुसार मंत्री विखे पाटील यांनी आवर्तन सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.सदर आवर्तनाचा उजवा कालव्या वरील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!