Friday, August 14, 2026

नेवासा तालुक्यात लाळ-खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती नेवासा, यांच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण फेरी -९ या मोहिमेचा शुभारंभ दि. १३ ऑगस्ट रोजी भानसहिवरा येथे सरपंच सौ मीनाताई किशोर जोजार यांच्या उपस्थितीत पार पडला. सदरच्या कार्यक्रम तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आदर्श पशुपालक पुरस्कार प्राप्त माजी उपसभापती किशोरभाऊ जोजर, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी भानसहिवरा येथील पशुपालक ,व ग्रामस्थ उपस्थित होते. पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने तालुक्यातील सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात आले की पुढील ४५ दिवस सदरील लाळ खुरकूत लसीकरण मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात तसेच तालुक्यात चालू झाली असून सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले सर्व पशुधनास लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. लाळ खुरकूत साथीचा आजार पशुधनास येऊ नये म्हणून प्रतिबंधक लस आपल्या पशुधनास टोचून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सदरच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी संजय लखवाल पंचायत समिती नेवासा ,जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ.उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अहिल्यानगर डॉ.मुकुंद राजळे, सहाय्यक आयुक्त तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी नेवासा
डॉ.राजेंद्र शेटे, पशुवैद्यकीय अधिकारी
डॉ.अमोल गायकवाड, पशुधन पर्यवेक्षक डॉ.एस.बी.सोनवणे, पशुधन पर्यवेक्षक डॉ.संतोष मासाळ तसेच तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!