भेंडा/नेवासा
लोकांचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांना धडा शिकविण्याकरिता प्रशासनात तुकाराम मुंडे यांचे सारखे अधिकारी निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग यांनी केले.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील प्राजक्ता कचरे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून दुय्यम निबंधक श्रेणी-१ पदांसाठी निवड झाल्याबद्दल, देडगाव येथील राजेंद्र आठरे यांची राज्यकर निरीक्षक पदी तर अंतरवाली येथील प्रसाद देशमुख यांची राज्यकर निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल नागेबाबा परिवाराच्या वतीने बुधवार दि.१९ ऑगस्ट रोजी नागेबाबा भक्तनिवासामध्ये
आयोजित नागरी सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून श्री.अभंग बोलत होते. नागेबाबा परिवारचे प्रमुख कडूभाऊ काळे,तुकाराम मिसाळ, इंजि. बाळासाहेब कचरे, अजित मुरुकुटे, अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे, सुखदेव फुलारी, गणेश गव्हाणे, शिवाजीराव तागड, अशोक वायकर, बापूसाहेब नजन, प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, प्राचार्य बाळासाहेब मोटे, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, केंद्र प्रमुख सीताराम आरगडे,नामदेव शिंदे, सरपंच शरद आरगडे, आबासाहेब काळे, अड.रवींद्र गव्हाणे, अण्णासाहेब नजन, दत्तात्रय उंडे, कल्याण मडके, अवधूत लोहकरे, भाऊसाहेब फुलारी, दत्ता मुंगसे, शिवाजी फुलारी, सुभाष चौधरी, प्रा.नबीलाल सय्यद, मुख्याध्यापक संदीप फुलारी, उत्तमराव आरगडे, सुनील वांढेकर, बाबासाहेब गायकवाड, राजेंद्र चिंधे,संजय नवले, गणेश महाराज चौधरी, रंगनाथ गव्हाणे, किसन यादव, रामदास आढगले, भाऊसाहेब तागड, अरुण गरड,ऋषी तागड, रंगनाथ गव्हाणे, भाऊसाहेब जगताप,डॉ.ईश्वर उगले आदि यावेळी उपस्थित होते.
श्री.अभंग पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना त्यांचा पूर्ण वेळ,धीर द्यावा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि झोकुन देवून अभ्यास केल्यास यश मिळतेच.
अध्यात्म आणि शिक्षणामुळे समाज उभा रहातो.ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासनात जावेत यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
*प्राजक्ता कचरे म्हणाली की, खूप स्पर्धा आहे, शंभर-दोनशे जागांसाठी लाख लाख उमेदवार असतात. ग्रामीण भागातील पालक मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतात हीच खूप मोठी बाब आहे.समाजाचा विश्वास नसतो त्यावेळी विद्यार्थ्यांना पालकांचा विश्वास खूप महत्वाचा असतो.
*राजेंद्र आठरे म्हणाले, या पदापर्यंत यायला मला आठ वर्षांचा कालावधी लागला. घरचे कमी शिकलेले असले तरी त्यांनी मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. माझे ९० टक्के यश हे वडील,भाऊ आणि पत्नी यांचे आहे. आई वडिलांच्या कष्ठाची आणि परिस्थितिची जाण ठेवल्यास यश नक्की मिळते.
*प्रसाद देशमुख म्हणाले, काही दिवस खाजगी कंपनीत नोकरी केली. करोना कालावधीत बरच कालावधी गेला, सायकलवरून पडल्याने फ़्रैक्चर झाले.
तरी ही जिद्दीने पूर्ण वेळ अभ्यास सूरु केला. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांमधील क्षमता ओळखून आणि त्यांना किमान ५ वर्षांचा कालवधी देण्याची तयारी ठेवावी, मुलांवर दबाव असू नये. बळजबरी करू नका,त्याला जे करायचे ते करू दया.
डॉ.शिरीष लांडगे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत बुद्धि बरोबरच शारीरक आणि मानसिक कस लागत असतो. यश हे यशच असते आणि ते मिळवण्यासाठी सर्वांची साथ गरजेची असते.शाळा महाविद्यालय मंदिरे आहेत,त्यांना जपले पाहिजे.
डॉ.शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले.अशोक पंडीत यांनी सूत्रसंचालन केले. सुनील गव्हाणे यांनी आभार मानले.


