Wednesday, September 23, 2026

शेती पंपाला अखंडीत विजेसाठी भेंडा विज उपकेंद्रासमोर ६ तास धरणे आंदोलन

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

शेतीसाठी दिवसा पूर्ण दाबाने १२ तास अखंडीत विज मिळावी या मागणी करीता भेंडा विज उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकरी वीज ग्राहकांनी विज उपकेंद्रासमोर सूरु केलेले धरणे आंदोलन विद्युत वितरण कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. युवा नेते उदयन गडाख यांच्यासह हजारो शेतकरी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

नेवासा तालुक्यातील भेंडा विज उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये कालवा, बोअरवेल, विहीर मध्ये पाणी आहे,परंतु विजे अभावी पिके डोळ्या देखत जळून चालले आहेत. यासंदर्भात सर्व शेतकऱ्यांनी दि.०९/०९/२०२६ रोजी आपणांस निवेदन दिले होते.  मुख्यमंत्र्यांनी शेतीसाठी दिवसा १२ तास वीज देण्याची घोषणा केली आहे. परंतु सध्या केवळ सहा तास पुरवठा करण्यात येत आहे. त्यातही प्रत्यक्षात २/३ तास वीज येते. त्यामुळे पिके जळून चालली आहे. आपणास निवेदन देऊनही प्रत्यक्षात कुठलीही सुधारणा झाली नाही. सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना हातातील पिके केवळ विजे अभावी गेल्यानंतर आम्हांला आत्महत्ये शिवाय पर्याय राहणार नाही. दिवसा शेतीसाठी १२ तास पुर्ण दाबाने अखंडीत वीज मिळावी व वाड्या वस्त्यांवर रात्री सिंगल फेज विज मिळावी यामागण्यासाठी शेतकऱ्यांनी बुधवार दि.२३/०९/२०२६ रोजी सकाळी १० वाजता भेंडा बसस्थानक चौक ते
उपकेंद्र पर्यंत पायी मोर्चाने येऊन
११ वाजेपासुन बेमुदत धरणे आंदोलन (सत्याग्रह) सूरु केले होते. सुमारे सहा तास चाललेल्या धरणे आंदोलनानंतर
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे नेवासा उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री.राहुल बडवे यांनी
मुख्यमंत्री यांच्या घोषणेप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला मोफत, दिवसा १२ तास, पुर्ण दाबाने अखंडित विज मिळावी या बाबत वरिष्ठ कार्यालायस आपले निवेदन सादर करण्यात येईल, सोलर प्रकल्प कार्यान्वित असल्यामुळे दिवसा ०८ तास अखंडित विज पुरवठा देण्यात येईल,ओव्हर लोड फीडर करिता एकूण ०९ नविन एबीस्विच दिवसात टाकण्यात येईल, रांजणगाव येथील ३३/११ के.वी. नविन उपकेंद्र प्रस्तावित केले होते त्या बाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव १५ दिवसात पुनःच सादर करून आपणास अवगत करण्यात येईल,वाहिनी विभाजन कामाचे साहित्य ०८ दिवसात उपलब्ध होईल आणि सदरचे काम २० ते २५ दिवसात पुर्ण होईल, वाड्या वस्त्यावर पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा बाबत, नवीन वाहिनीचे विभाजन काम पूर्ण झाल्यानतर सदर वाहिनी वर नविन एसडीटीचे काम करून सदरचा विद्युत पुरवठा ०१ महिन्यात योग्य दाबाने मिळेल सबस्टेशन मध्ये टॅप वाढवुन सौंदाळा गाव-गाव खाते, भेंडा खुर्द, पंडित वस्ती व रामनगर वीज पुरवठ्याशी संबंधित आवश्यक कामांचे
अंदाजपत्रक तयार करण्यात येईल सदरचे काम ०१ महिन्यात पुर्ण करण्यात येईल. ७. भानस हिवरा फिडर वरिल कामाचे नियोजन करण्या करिता सहाय्यक अभियंता, कुकाणा-२ कक्ष यांना सूचना होलटेज वाढविण्यात येईल, स्मार्ट मीटर बाबत सर्व परिसरामध्ये कार्यशाळा आयोजित करून त्या बोबत ग्राहकांचे योग्य ते समाधान करण्यात येईल तसेच स्मार्ट मीटर सोबत संबंधित विज ग्राहकांना सिरीज मध्ये चेक मीटर बसवण्यात येईल, आपले प्राप्त निवेदन वरिष्ठ कार्यलयास पाठवण्यात येईल असे
लेखी आश्वासन दिल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात युवा नेते उदयन गडाख,सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे, कॉ.भारत आरगडे, कॉ.अपपासाहेब वाबळे,वैभव नवले,दिपक मगर,कॉ.बाबासाहेब सोनपुरे,बाळासाहेब आरगडे,सोपान लोखंडे,दत्तात्रय शिरसाठ,बाबासाहेब चौधरी,नागेश आघाव,सुनील मापारी,ज्ञानेश्वर थोरात,अशोक साळवे,अरुण साळवे,दिपक अंबाडे,दत्तू वाकचौरे,सुनील खरात,दत्तूभाऊ काळे,नामदेव निकम,किशोर मिसाळ,सागर नवले,लक्ष्मण चामुटे,दिगंबर नवले,लक्ष्मण आरगडे,अशोक पंडित, काकासाहेब काळे आदि सहभागी झाले होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!