Tuesday, October 20, 2026

श्रीसंत किसन महाराज सुडके संस्थानचे राज्यस्तरीय साहित्य गौरव व पत्रकारिता पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील  कांगोणी फाटा येथील श्री संत किसन महाराज सुडके संस्थानच्या वतीने देण्यात येणारे सन २०२६ या वर्षाचे राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार व पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असून भेंडा येथील पत्रकार सुखदेव फुलारी यांना राज्यस्तरीय निर्भिड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मठाधिपती बाळकृष्ण महाराज सुडके यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना  बाळकृष्ण महाराज सुडके यांनी सांगितले की, आध्यात्मिक कार्यात साहित्याचा असलेला सहभाग व वारकरी संप्रदायात नेवासा येथील पैसखांब मंदीरात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची केलेली निर्मिती लक्षात घेऊन श्री संत किसन महाराज  सुडके  संस्थानच्या वतीने साहित्य गौरव पुरस्कारांचे आयोजन केले होते. स्पर्धेकरीता वेगवेगळ्या वाङ्गमय प्रकारातील १६५ पुस्तके आले होते. तज्ञ परिक्षकांनी परिक्षण करुन विजयादशमीच्या दिवशी  मंगळवार दि.२० ऑक्टोबर रोजी साहित्य व पत्रकारिता पुरस्कार-२०२६ जाहिर करण्यात आले,ते असे…
*राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार २०२६ निकाल घोषित* 
*कथा संग्रह:–सुनील मंगेश जाधव (मर्म), आबासाहेब घावटे (लावण्या),काशिनाथ माटल (सावट).
*आत्मचरीत्र व्यक्ती चरीत्र:– डॉ. प्रमोद चौधरी (पैल तिरावरुन तर असं झालं),सतिश नाईकवाडे (केकताड),विठ्ठल पांडुरंग पाटील(मायनस शुन्य).
*कादंबरी:–  शेखर खंडेराव फराटे (मानधुरा मी येतोय),ऋषिकेश रोहीदास गोल्हार(रानोबाचा माळ),राजेश चौरे (जिद्द पेरताना).
*प्रवास वर्णन:– सौ.वासंती प्रकाश घाडगे (देवाचिये द्वारी),प्राचार्य रेखा दीक्षित,कोल्हापूर (अमृत पर्यटनांनुभव), विजया लक्ष्मी 
देवगोजी (मध्य रात्री सुर्य पहाणारा देश).
*ललित लेख:– डॉ.दिनेश वाघुंबरे (मराठी साहित्यातील लोक तत्वे), डॉ योगेश गोतारणे(गाव शहराचा मागोवा),ऊर्मिला चाकुरकर (लेखकाचे घर).
*नाटक:– ऊदय गणपत जाधव(गार्गी), डॉ.श्रीकांत पाटील (रंजक नाट्य छटा).
*संत साहित्य:– ज्ञानोबा दयारामजी  हटवार (ग्राम गितेतील क्रांती दर्शने).
*काव्यसंग्रह:–  इंद्रजित पाटील (लापनिका),एकनाथ देशमुख (गाथा एक नाथा),अरविंदा राजधर भामरे( शापित कोलहालाच्या नोंदी),आकाश हरिभाऊ भोरडे(झालं बाटुकाचं जिण),चंद्रकांत पोतदार(धुराच्या सैल वेलांटया).
*बाल साहित्य:- उत्तम सदाकाळ (बोळातल भुत),मुरहारी कराड( येरे येरे ढगोबा), बबन शिंदे( मस्त मजेत राहु),
*राज्यस्तरीय विशेष पुरस्कार असे:-
——————————
*निर्भिड पत्रकारिता पुरस्कार:– सुखदेव फुलारी(भेंडा).
*ग्रामिण उद्योग वयवसाय:- सोपानराव शिकारे.
*धन्वंतरी पुरस्कार:– डॉ.महेंद्र शिंदे 
*शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार:- कु.प्राजक्ता कचरे (कुकाणा) 
*प्रगतशिल कृषी पुरस्कार:- श्री.महेश रहाटळ.
रविवार दि.२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता कांगोणी फाटा येथील श्री संत किसन महाराज सुडके संस्थान येथे संत-महंत व मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे असल्याचे गुरुवर्य बाळकृष्ण महाराज सुडके  यांनी सांगितले.
- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!