Tuesday, October 20, 2026

जिल्हा बँक निवडणूकी निमित्ताने राम शिंदेंची गडाखांच्या निवासस्थानी दुसऱ्यांदा भेट!

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

सोनई/ता. नेवासा :

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला असून, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सोनई येथील निवासस्थानी दुसऱ्यांदा भेट दिली. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी झालेल्या या भेटीत माजी खासदार यशवंतराव गडाख आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी सुमारे तासभर चर्चा झाली.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम टप्प्यात या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, या दृष्टीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभापती राम शिंदे यांच्या या भेटीप्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख, प्रा. भानुदास बेरड, विश्वासराव गडाख, उद्योजक विजयराव गडाख तसेच अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनीलराव गडाख आदी उपस्थित होते.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या भेटीतून जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते, याकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!