नेवासा/प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत विविध उद्योगातील कामगारांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत व सांस्कृतिक कार्यक्रम-भजन स्पर्धांमधून मानसिक आधार देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी केले
नेवासा तालुक्यातील देवगड येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सोमवार दि.२६ ते बुधवार दि.२८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अयोजित १७ वे राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबीराचा समारोप दि.२८ रोजी श्रीकृष्ण महाराज उगले यांच्या काल्याचे कीर्तनाने झाला.
त्यावेळी आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री.शेवाळे बोलत होते.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे नाशिक विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती भावना बच्छाव,
जळगावचे कल्याण अधिकारी सत्यजीत चौधरी, साखर कामगार प्रतिनिधि मंडळाचे उपाध्यक्ष डी.एम.निमसे,कामगार नेते अशोकराव पवार, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,शिबिर संचालक कृष्णा महाराज उगले व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना *श्री.डी.एम.निमसे* म्हणाले की, कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार व त्यांचे पाल्य,कुटुंबियांसाठी आजार मदत निधी,विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती,परदेश दौरा शिष्यवृत्ती, गुणवंत कामगार पुरस्कार, विविध क्रीडा स्पर्धा, भजन-गायन,नाट्य स्पर्धा आदी योजना राबविल्या जात आहेत.
कामगारांच्या सर्वांगीण सुखाकरिता हे मंडळ काम करत आहे.
प्रस्ताविक करताना *श्रीमती भावना बच्छाव* म्हणाल्या की, मनशांती देणाऱ्या देवगड तीर्थक्षेत्री मंडळामार्फत घेण्यात आलेल्या भजन प्रशिक्षण शिबिराला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले.
उदय महाराज राणे (ठाणे), पांडुरंग महाराज बुनगे(नाशिक) यांनी ही मनोगत व्यक्त करून या तीन दिवसीय निवासी भजन प्रशिक्षण शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल नाशिक विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती भावना बच्छाव व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
कामगार कल्याण मंडळाचे अहिल्यानगर केंद्र प्रमुख अनिल बोरसे,
भास्कर शिरोळे,निलेश वाघ,शशिकांत पाटोळे,पंकज देशमुख,विवेक देशमुख,संदीप चव्हाण,राजेंद्र नांद्रे,संदीप पवार,योगेश पाटील, वंदना पवार, वैशाली सोनवणे, प्रीती पाटील,कविता कासार,
रमेशानंदगिरीजी महाराज, सागर महाराज टेमक, अमोल महाराज पानमंद, भास्कर महाराज मुळक, तुषार महाराज तागड, अमोल महाराज धाडगे, संभाजीराव माळवदे, अण्णासाहेब गर्जे, पोपटराव उगले, अशोक धुमाळ, अप्पासाहेब बोडखे,श्रीरंग जाधव, दादासाहेब मरकड सचिन मरकड, शंकर भारस्कर, अरुण घोडके आदि यावेळी उपस्थित होते.
कल्याण निरीक्षक महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. कल्याण निरीक्षक शशिकांत पाटोळे यांनी आभार मानले.
पसायदानाने शिबिराची सांगता झाली.


