Wednesday, October 28, 2026

जय भगवान’चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

पाथर्डी/प्रतिनिधी

कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने श्री निंबादेत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथील जय भगवान युवा प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रातील उपक्रमशील व प्रेरणादायी व्यक्ती व संस्थाना देण्यात येणारे यंदाचे राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिनाथ दहिफळे यांनी नुकतेच जाहीर केले.

निंबादैत्य नांदूर येथील भाऊ-बाबा मंदिर प्रांगणात आज बुधवार दि. २८ सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात श्रीक्षेत्र भगवान गड संस्थानचे कृष्णा महाराज शास्त्री, सुदर्शन महाराज शास्त्री, रामदास महाराज शास्त्री, केशव महाराज शास्त्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन जय भगवान युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

जय भगवान युवा प्रतिष्ठानचे भगवान पुरस्कार्थी असे…

*राष्ट्रसंत बाबा आदर्श वारकरी पुरस्कार:- केशव महाराज शास्त्री (हनुमान संस्थान राणेगाव), आदर्श

*कार्यगौरव पुरस्कार:- सरिता मुंडे (मंडळाधिकारी, नेवासा), सुजाता खंडागळे (तलाठी, भगुर), डॉ. आदिनाथ आंधळे (बीडीओ, गडचिरोली), आकुंश पालवे (कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी ), महेश डाळीम्बकर (कायझेन अकॅडमी).

*आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारः– सौंदाळा(ता. नेवासा), आखेगाव(ता. शेवगाव), वंजारवाडी(ता. जिल्हा बीड).

*आदर्श सरपंच पुरस्कार:— सरपंच शरद आरगडे पाटील (सौंदाळा), सरपंच अयोध्या काटे (आखेगाव),वैजीनाथ तांदळे (वंजारवाडी, बीड). आदर्श

*शिक्षक पुरस्कार:– पंकज मारकड (टाकळी अंबड, ता. पैठण), डॉ. कैलास दौंड (नांदूर निंबादेत्य), संजय राजगुरू (गेवराई), डॉ. संतोषकुमार राठोड (सुळे पिंपळगाव, शेवगाव), शितल गोरे (चव्हाणवाडी,). आदर्श

*शाळा पुरस्कार:– तोंडुळी, ता पाथर्डी, चिलेखनवाडी(ता. नेवासे), उमापूर(ता गेवराई), नेवासे बुद्रुक, प्राथमिक विद्यामंदिर निर्मलनगर, शेवगाव, प्राथमिक शाळा अकोले, (ता पाथर्डी).

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!