नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील कु.ऋतुजा विश्वनाथ मिसाळ हिने वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. पदवी नंतर ‘एमडी रेडिओलॉजी’ ही पदवीत्तर पदवी संपादन केली आहे.
कु.ऋतुजा हिने बारावी शास्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गुणवत्तेच्या जोरावर पुणे येथील बी.जे.शासकीय मेडिकल महाविद्यालयामधून एम.बी.बी.एस.ची पदवी मिळविली होती.
एम.बी.बी.एस. पदवी नंतर तिने नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये एमडी रेडिओलॉजीचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉ.ऋतुजाने भेंडा गावाच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.
तिला आई सौ.राणी मिसाळ,वडिल डॉ.विश्वनाथ मिसाळ,मावशी प्राथमिक शिक्षिका मनीषा धनापुणे, काका मुख्याध्यापक कैलास धानापुने,विष्णू मिसाळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक अशोकराव मिसाळ, उद्योजक बापूसाहेब नजन,ऋतुजाचे पती डॉ. प्रवीणसिंह हाके, सासरे शंकरराव हाके, दिर विजयसिंह हाके यांनी तिचे अभिनंदन केले.


