Saturday, November 14, 2026

तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान येथे  छत्रपती शिवाजी महाराज चरीत्र कथेचे आयोजन

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान येथे  छत्रपती शिवाजी महाराज चरीत्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान भानसहिवरे येथे राष्ट्रसंत श्री श्री 1008 सदगुरू महंत दिगंबर बाबाजी आराध्य, राष्ट्रसंत श्री श्री 1008 सदगुरु महंत भास्कर गीरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व उत्तराधीकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिनाई जागृत देवस्थान चा जिल्हास्तरीय भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या दि. 17 जानेवारी 2027 ते 23 जानेवारी 2027 शाकंभरी पौर्णीमेच्या मुहुर्तावर स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी महाराज यांच्या शिव चरीत्र कथेचे आयोजन केले आहे.

शिवशाहीर सिंहललकार नानासाहेब पाटील कोलते यांच्या मुखारविंदातून सात दिवस शिवचरीत्र कथा होणार आहे 24 जानेवारी 2027 रोजी सायंकाळी 6 ते 8 यावेळेत महंत शांतीब्रम्ह आदिनाथ महाराज शास्त्रीजी तारकेश्वर गड महींदा पाथर्डी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे होणाऱ्या कार्यक्रमास अखंड अन्नदान होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी सहभागी होवूण कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहान तिर्थक्षेत्र शिनाई देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!