अहिल्यानगर/प्रतिनिधी
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अहिल्यानगर येथील नागेबाबा हाऊसमध्ये मुख्य शाखेचा वर्धापन दिन दीपोत्सवाने साजरा करण्यात आला.
रविवार दि.२२ नोव्हेंबर रोजी मुख्य शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त नागेबाबा हाऊस येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. दीपप्रज्वलन करून हा वर्धापन दिन उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी नागेबाबातील सर्व सहकारी तसेच संपूर्ण नागेबाबा परिवार मोठ्या उत्साहाने उपस्थित होता. सर्वांच्या सहभागातून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. या सोहळ्याने एकता, आपुलकी आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली.


