Tuesday, November 24, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्याना 26 नोव्हेंबर पर्यंत ऊस तोड स्थगित करण्याचे आदेश

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांनी मान्य केल्याप्रमाणे शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार उद्या मंगळवार दि.24 नोव्हेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत तोडणी करण्यात आलेला ऊस गाळप करुन दि.26 नोव्हेंबर 2026 पर्यंत सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड स्थगित करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाला योग्य व रास्त दर मिळण्याबाबत तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी व दि. 23 नोव्हेंबर रोजी होणा-या भव्य मोर्चाबाबत निवेदनाच्या अनुषंगाने।स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रावसाहेब लवांडे यांना अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हंटले आहे की, खासदार श्री. निलेश ज्ञानदेव लंके, माजी खासदार श्री. राजू शेट्टी संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना, श्री. रविंद्र मोरे शिवसेना शेतकरी सेना व इतर शेतकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी सन 2026-27 मधील गाळप होणा-या उसाला प्रतिटन 4,000/-रुपये पहिली उचल जाहीर करणेबाबतच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने दि. 26/11/2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांच्या चेअरमन यांच्याशी बैठक आयोजित करण्यात येत आहे.

तसेच सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष/कार्यकारी संचालक यांना कलविले आहे की, दि.26/11/2026 रोजी सकाळी ठिक 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे वरील विषयाबाबत चर्चा करण्यासाठी होणा-या बैठकीस आपण व्यक्तिशः उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर बैठकीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने उपस्थित राहणे भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अधिनियमातील कलम 163 नुसार बंधनकारक आहे. सदर बैठकीस कोणीही प्रतिनिधी अथवा व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवु नये. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांनी मान्य केल्याप्रमाणे शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार उद्या दि.24 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत तोडणी करण्यात आलेला ऊस गाळप करुन दि. 26/11/2026 पर्यंत सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड स्थगित करावी.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!