Sunday, November 29, 2026

बाभूळखेडा येथे आधुनिक तंत्रज्ञान वापरून सलग नारळबागेची उभारणी

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील बाभूळ खेडा गावामध्ये प्रगतशीर शेतकरी प्रवीण विधाटे यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून सलग नारळाची साडेतीन एकरावर फळबाग उभी केली आहे.

पेरू, चिक्कू यासारख्या सलग बागा नारळाच्या निर्माण करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे व महाराष्ट्र शासनाचे कृषी खात्याची कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी नेवासा तालुक्यात ही नवी संकल्पना सुरू केली आहे. प्रगतशील शेतकरी प्रवीण विधाटे यांनी सात बाय सात मीटरवर लागवड करून नारळाची कोलंबस ही जात वापरली आहे. साधारण ३५० नारळाची रोपे लावली आहेत,त्यामध्ये आंतरपीक तीन वर्षे घेता येते. त्याप्रमाणे श्री.विधाटे यांनी आद्रक आंतरपीक घेतले आहे. यानंतर पुढील हंगामात सुद्धा नारळाच्या बागेत आंतरपीक घेण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ.ढगे यांनी त्यांच्या समवेत चर्चा केली तेव्हा विधाटे म्हणाले की, पाणी विहिरीला भरपूर व गोड आहे ठिबक सिंचनची व्यवस्था करून पाण्याची बचत करण्यात येत आहे.तसेच सुरुवातीला चांगले कुजलेले शेणखत वापरले आहे. कृषी अधिकारी श्री सुडके यांनी जमिनीचे व मातीचे निरीक्षण केले, तेव्हा त्यांना शेतामध्ये मातीत चुनखडीचे अनेक खडे आढळले. त्यांनी यासाठी वाफे घेऊन शेणखतात मिसळून सल्फर खताचा वापर करावा अशी बहुमोल सूचना केली. नारळ पिकावर कीड व रोग यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो तसेच उत्तम कुजलेले शेणखत व रासायनिक खतांची शिफारशीप्रमाणे मात्रा दिल्यास चांगले उत्पादन येऊन बाजारामध्ये चांगले भाव मिळत असल्यामुळे दोन पैसे शेतकऱ्याला मिळतात असा दावा डॉक्टर ढगे यांनी केला.
श्रीक्षेत्र देवगडचे हभप बाळकृष्ण महाराज कानडे व प्रगतशील शेतकरी अशोकराव नलवडे यांनी या बागेला कृषी अधिकारी व शास्त्रज्ञ समवेत भेट देऊन नारळाची वाढ उत्तम असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

*नारळाचे अर्थशास्त्र…
पहिले प्रथम तीन ते साडेतीन वर्ष नारळ येत नाहीत कोलंबस या नवीन जातीची उंची कमी असल्यामुळे नारळे सहजपणे तोडता येतात.एका झाडाला ४०० ते ५०० नारळ मिळतात एका एकरात १०० नारळ चांगली उभी राहतात, म्हणजे एका एकरातून ४ हजार ते ५ हजार नारळ मिळतात .आज भाव रुपये ५० प्रति नारळ धरला तर एकरी दोन ते अडीच लाख रुपये मिळतात तीन वर्षापर्यंत आंतरपीक घेता येते.
-डॉ.अशोकराव ढगे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!