Friday, November 22, 2024

ओबीसी एल्गार मेळावा उच्चांकी आणि शिस्तबद्ध होण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करा -माजी आ.पांडुरंग अभंग यांच्या सूचना

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर/प्रतिनिधी

ओबीसी नेते ना. छगन भुजबळ साहेब व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थित नगर येथे क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर ३ फेब्रुवारी होत असलेल्या ओबीसी एल्गार मिळावा उच्चांकी आणि शिस्तबद्धरीतीने पार पाड़ण्यासाठी तयारीला लागा आणि मायक्रो प्लॅनिंग करा अशा सूचना समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

अहमदनगर येथे ३ फेब्रूवारी रोजी ना.छगन भुजबळ यांचे उपस्थितीत होत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या
जिल्हास्तरीय नियोजन बैठक
माजी आ.अभंग यांचे अध्यक्षेतेख़ाली
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात
संपन्न झाली,त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.माजी नगराध्यक्ष अभय अगरकर, माजी महापोर भगवान फुलसौंदर,अंबादास गारुडकर,खंडूजी भूकन,ऋषिकेश ढाकणे,विक्रम राठोड, सचिन गुलदगड, सुभाष लोंढे, सुधाकर आव्हाड, रमेश गोरे, निवृत्ती दातीर, राम अंधारे, ऋषिकेश ढाकणे, रामराव चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब बोराटे, शरद झोडगे, प्रशांत शिंदे, जालिंदर बोर्डे, भगवान टिळेकर, मंगलताई भुजबळ,सारिका अंधारे, अशोक कोळेकर,भिवाजी आघाव,शशिकांत मतकर,जालिंदर विधाटे,संदीप बेहळे,
कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोरुडे, विनायक ताठे

आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार पांडुरंग अभंग पुढे म्हणाले की ओबीसी नेते नामदार छगनराव भुजबळ, माजी आ.प्रकाश बापू शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर,आमदार माधवराव जानकर व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत ३ फेब्रुवारी रोजी नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा होत आहे, या मेळाव्याची तयारी करताना जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये प्रत्येक गावात घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांना व ओबीसी जनतेला मेळाव्यासाठी निमंत्रित करावे. कोणाची गैरसोय होणार नाही याच्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. ओबीसी मध्ये असलेल्या सर्व जाती धर्मांच्या व्यक्तींना, भटक्या विमुक्तांना मेळाव्यासाठी बरोबर घ्यावे.हा मेळावा उच्चांकी आणि सुरक्षित,शिस्तबद्ध होईल याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी खंडूजी भुकन, ऋषिकेश ढाकणे, अरविंद सोनटक्के(पाथर्डी),धनंजय गाडेकर(राहाता), प्रमोद मंडलिक (अकोला), अमित मंडलिक (संगमनेर), संगमनेर संजय गारुडकर नगर किशोर जेजुरकर (केडगाव), ऋषिकेश शेलार (श्रीगोंदा),दादासाहेब चितळकर(नगर), रामा अंधारे(शेवगाव), शशिकांत मतकर (नेवासा), चंद्रकांत झुरंगे (श्रीरामपूर), रमेश सानप, बाळासाहेब भुजबळ, नारायण येवले, अशोक कोळेकर यांनी मनोगत व्यक्त करून मौलिक सूचना केल्या.
अंबादास करोडकर यांनी प्रास्ताविक, स्वागत केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!