Wednesday, May 13, 2026

शिर्डी लोकसभेसाठी या नेत्यांला उमेदवारी देण्याची मागणी 

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात लोकसभा निवडणूक चे वारे वाहू लागले आहे असे बोलले जात आहे की मार्च महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागू शकते सर्वच राजकीय पक्ष लोकसभेसाठी तयारीला लागली आहे.

विविध पक्षांनी बैठका घेत जागावाटपही सुरू आहे काही नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातही जोरदार तयारी सुरू आहे.

दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघात मनसे नेते बाळा नांद‌गावकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी उत्तर नगर जिल्ह्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शुक्रवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व मनसे सैनिक व पदाधिकाऱ्यांनी बाळा नांदगावकर यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला

असल्याचे दत्तात्रय कोते, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या बरोबर मतदार संघाबाबत विविध प्रश्नांवर चर्चा करताना सांगितले की, बाळा नांदगावकर यांचा नगर जिल्ह्यातील

नागरिकांशी चांगला जनसंपर्क असून त्यांना नगर जिल्ह्याची सर्व राजकीय परिस्थितीचा अभ्यास आहे. त्यांना शिर्डी लोकसभा मतदार संघात उमेदवारीची संधी दिली तर आम्ही सर्व मनसे सैनिक अहोरात्र मनसे

उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी काम करू, अशी ग्वाही यावेळी मनसेसैनिकांनी राज ठाकरे यांना दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!