Friday, May 17, 2024

छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट;16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर 3 फेब्रुवारी 2024

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत स्वत: छगन भुजबळ यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच भुजबळ यांच्या राजीनाम्यावर अनेक तर्कवितर्कही व्यक्त केले जात आहे. राजकीय वर्तुळातूनही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

*राजीनामा स्वीकारला नाही-उपमुख्यमंत्री फडणवीस

छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता. पण आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक बोलतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

*ही भुजबळांची चपराक-आ.पडळकर

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ यांनी 17 नोव्हेंबरला झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भुजबळ यांना राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!