भेंडा राहुल कोळसे.भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सह संयोजक व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे संभाव्य उमेदवार नितीन उदमले यांना पक्षाने भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
यासंदर्भातील पत्र नुकतेच किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिले आहे.या निवडीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे,किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे प्रवीण काळभोर,
कृषी पदवीधर चे प्रदेश संयोजक राहुलजी भोसले तसेच प्रदेश व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.नितीन उदमले हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव मोठ्या प्रमाणात भाजपाच्या देश व प्रदेश पातळीवर
घेतले जात आहे. त्यादृष्टीने नितीन उदमले यांनी जोरदार तयारी शिर्डी लोकसभा मतदारसंघात केली आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर एक पत्रक टाकून त्यांनी लोकसभा लढवणार असे ठणकावून सांगितले आहे. त्यांना जिल्ह्यातील नेते मंडळींची चांगली साथ मिळत आहे.
उदमले यांना भाजपाची उमेदवारी द्यावी अशी भाजपाच्या जिल्ह्यातील नेत्यांचा आग्रह आहे. तसे झाले तर भाजपाकडून नितीन उदमले हे निवडून येण्याची शक्यता आहे.उच्चशिक्षित म्हणून नितीन उदमले यांच्याकडे बघितले जाते.त्यांना शेतकरी, नोकरी , तरुणवर्ग,
महिला, नोकरदार तसेच विविध विषयांवर चांगले काम केले आहे. त्यामुळे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून भाजपाने उदमलेंना चांगली ताकद दिलेली बघायला मिळत आहे.