Saturday, August 30, 2025

नगर जिल्ह्यातून जात असलेल्या त्या औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस मान्यता…

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जून २०२३ मध्ये घेतला होता. आराखड्यासाठी

नेमलेल्या सल्लागार संस्थेने नुकताच अहवाल सादर गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी (दि. ७) रोजी पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या २१३ किलोमीटर लांबीच्या अंतिम

आखणीस मान्यता देत रस्ते विकास महामंडळावर बांधणीची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे पुणे ते नाशिक अंतर पाच तासांवरून केवळ तीन तासात पार करता येणे शक्य असून, पुणे, नगर आणि नाशिक या तीन

जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल.राज्यभरातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने ४,२१७ किमीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातीलच एक म्हणजे पुणे ते नाशिक

औद्योगिक महामार्ग होय. अंदाजे २० हजार कोटी रुपये इतका अपेक्षित खर्च असलेल्या या १८० किमीच्या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर कमी वेळेत पार करता येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून प्रत्यक्ष स्थळ

पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास केला आहे. तुलनात्मकदृष्ट्या सर्वाधिक सुयोग्य आखणीचा महामार्गासाठी विचार करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

प्रस्तावित द्रुतगती महामार्गाची आखणी रेषा राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहरांजवळून प्रस्तावित आहे. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा भाग पुणे ते शिर्डी साधारण

लांबी १३५ किलोमीटर, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंज (सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग) साधारण लांबी ६० किलोमीटर व सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक-निफाड राज्यमहार्गाचा भाग) साधारण लांबी १८ किलोमीटर असे एकूण २१३ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल.

– औद्योगिक द्रुतगती महामार्ग पुणे, नगर, व नाशिक या जिल्ह्यातून प्रस्तावित

– नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला लाभ होणार, आयटी कंपनीला चाल मिळणार

– द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे द्रुतगती महामार्गाने जोडली जातील

– महाराष्ट्रातील द्रुतगती महामार्गाचा सुवर्णत्रिकोण पूर्ण साधला जाईल

– दळणवळण गतिमान झाल्याने उद्योगाना याचा मोठा फायदा होईल

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!