Sunday, April 28, 2024

भविष्यवेधी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर-गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटेकर

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण घेतल्यानंतर भविष्यवेधी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे प्रतिपादन नेवासा
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटेकर यांनी केले.

नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विधार्थांना अध्यापन करत असलेल्या शिक्षकांसाठी (टप्पा सातवा ) नेवासा फाटा येथील दादासाहेब हरीभाऊ घाडगे पाटील विद्यालय येथे सुरु असुन बुधवारी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी या प्रशिक्षणास सहाय्यक गटविकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटेकर यांनी भेट देऊन सर्व प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

श्री. पाटेकर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने शिकण्यास तयार करणे, pisa redy मुल तयार करणे , तसेच विविध महत्वाचे शैक्षणिक विषयांची माहिती दिली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले. या सन्मानित शिक्षक व शिक्षक भारावून गेले . तर जिल्हास्तरावरील इन्सपायर अवार्ड योजने अंतर्गत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन पाटेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले .
या प्रशिक्षणात सुलभक म्हणून काम करते असलेले विषयतज्ञ सामी शेख ,भास्कर नागरगोजे, बाळकृष्ण मुळे, संतोष रासकर, पृथ्वीराज वाघाडे, सुमन तिजोरे , शांता मरकड , सुप्रिया इंगळे , ज्योती साबळे यांनाही यावेेळी सन्मानित करण्यात आले. अध्यापक पांडुरंग बरे यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!