अहमदनगर दि. 9 फेब्रूवारी
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त झालेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास, आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई आदेश जारी केला असुन हा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार असल्याचे एका आदेशाद्वारे कळविले आहे.