माय महाराष्ट्र न्यूज:पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान
विभागाने याबाबत माहिती दिली असून, आजपासून दोन ते तीन दिवस म्हणजेच 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे असं म्हटंलय.
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या X अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जळगाव, सांगली,
सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्याची शक्यता आहे.डॉ. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, आज विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोबत वादळी वारे 30-40 किमी प्रति
तास वेगाने वाहणार असल्याचे देखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटलंय. मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि परभणी येथे वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
डॉ. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, आज विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोबत वादळी वारे 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणार असल्याचे देखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटलंय. मराठवाड्यातील जालना,
हिंगोली आणि परभणी येथे वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.