माय महाराष्ट्र न्यूज:युको बँकेच्या शनिशिंगणापूर शाखेकडून अपघाती मृत्यू झालेल्या खातेदाराचे वारसाला दोन लाख रुपये अपघाती विमा नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात आली.
युको बँक ही नेहमीच आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असते. युको बँकेच्या शनी शिंगणापूर या शाखेचे खातेदार पुरोहित कै.श्रीकांत मधुकर जोशी हे शनिशिंगणापूर-सोनई येथील रहिवासी असून
त्यांचा अहमदनगरहून येते वेळी अपघाती मृत्यू झाला होता. युको बँकेच्या शनिशिंगणापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक राहुल लेकुरवाळे यांनी कै. जोशी यांच्या नातेवाइकांना संपर्क केला व सविस्तर विचारपुस करून
त्यांचा खाते चेक केल्यानंतर असे लक्षात आले की त्यांनी बँकेचे एटीएम कार्डचा वापर केला आहे.युको बँकेच्या रूपे एटीएम कार्ड वरती दोन लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण असते हे व्यवस्थापक
श्री. लेकुरवाळे यांनी जोशी त्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले.नंतर जोशी यांच्या नातेवाइकांनी कागद पत्रांची पूर्तता करून ते शाखेत जमा केले. त्यानंतर शाखेचे सह व्यवस्थापक हनुमु खेतावत यांनी वेळोवेळी टाटा एआयजी या इन्शुरन्स
कंपनीकडे पाठपुरावा करून विमा क्लेम मंजूर करून घेतला.मंजूर झालेल्या दोन लाख रुपये रकमेचा धनादेश कै.जोशी यांच्या वारसदार पत्नी श्रीमती मानसी जोशी यांना शाखा व्यवस्थापक श्री.लेकुरवाळे यांच्या हस्ते यांना सुपूर्त करण्यात आला.
यावेळी बोलताना व्यवस्थापक श्री.लेकुरवाळे म्हणाले, बँक आपल्या खाते धारकांना अशा विविध प्रकारच्या योजना देत असते त्याचा उपयोग सर्वांनी घेतला पाहिजे. यावेळी बँकेचे कर्मचारी महेश धाडगे, महेश गोडसे, सुखमिंदर सिंह सग्गु, गोरक्षनाथ लकडे, राहुल झिने तसेच इतर खातेदार ही उपस्थित होते.