माय महाराष्ट्र न्यूज:तब्बल दोन महिन वाट पाहिल्यानंतर आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली. सोयाबीनचा भाव क्विंटलामागं ५० ते १०० रुपयांनी वाढला होता.
सोयाबीनची भाववाढ होण्याला काही महत्वाची कारणं आहेत. तसेच ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादन अंदाजात कपात करण्यात आली आहे.सुरुवात करूयात भावापासून. सोयाबीनचा भाव आज ५ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता.
म्हणजेच कालच्या तुलनेत बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांनी वाढला होता. तर प्रक्रिया प्लांट्सनीही आपला खरेदीचा भावही ५० ते १०० रुपयांनी वाढवला. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनचा खरेदीचा भाव आज ४ हजार ६५० ते ४ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान काढला होता.
सोयाबीनचे भाव वाढण्याला महत्वाचा घटक कारणीभूत ठरला तो तेलाच्या भावातील वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे भाव वाढले. कारण महत्वाच्या इंडोनेशिया आणि मलेशियात एल निनोमुळे पाम उत्पादन कमी झाले. यामुळे मागील
दोन महिन्यांपासून पामतेलाचा पुरवठा कमी कमी होत आहे. तर जानेवारीतील उत्पादनातील घट जास्त होती. यापुढील काळातही पामतेलाचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. पामतेलाचे भाव वाढल्याने भारताची पामतेल आयातही कमी होत आहे.
पामतेलाचे भाव वाढल्याने आयातदार सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची खरेदी करत आहेत. कारण यंदा सोयाबीनचे जागतिक उत्पादन वाढल्याने सोयातेलाचे भाव कमी झालेले आहेत. तर सूर्यफुल तेलही स्वस्त आहे. कच्चे पामतेल आयातीचा दर ९३० डाॅलर
प्रतिटन झाला. याउलट सोयातेल आयातीचा भाव ९१५ डाॅलर प्रतिटन आणि सूर्यफुल तेल आयातीचा भाव ९१० डाॅलर प्रतिटन आहे. म्हणजेच देशात पामतेल आयात करणे सोयातेल आणि पामतेलापेक्षा महाग होत आहे. यामुळे सहाजिकच
सोयातेल आणि सूर्यफुल तेलाला मागणी वाढली. यामुळे सोयातेलाचेही भाव वाढत आहेत. सोयातेलाला मागणी येत असल्याने गाळपासाठी सोयाबीनलाही मागणी वाढली. याचा परिणाम सोयाबीन भावावर दिसून येत आहे.
आणखी एक महत्वाचं कारण आहे बाजारातील कमी होत असलेला पुरवठा. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनच्या भावात मोठी तेजी आली नाही. तसेच बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच असल्याने शेतकऱ्यांनी माल विकला.
आता बाजारातील आवक हळूहळू कमी होताना दिसत आहे. आवकेत अजूनही मोठ्या प्रमाणात घट झाली नाही. पण आवकेचे प्रमाम कमी होत आहे. त्यातच तेलासाठी सोयाबीनला मागणी आल्याने भावात सुधारणा दिसून येत आहे.
सोयाबीनची आवक आणखी पुढील काही आठवड्यांमध्ये कमी कमी होत जाईल, असे सोयाबीन बाजारातील व्यापारी सांगत आहेत.