नेवासा
गावठी कट्टे व जीवंत काडतसे बाळगणारे नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरा येथील ३ सराईत आरोपी जेरबंद नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत.
याबाबद अधिक माहिती अशी की,पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोनि दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हेमंत थोरात, सफौ भाऊसाहेब काळे, पोना रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चासफौ उमांकात गावडे यांचे पथक तयार करुन जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले.या पथक जिल्ह्यातील यापुर्वी अग्शिस्त्रे बाळगणारे इसमांचे रेकॉर्ड तपासुन अग्निशस्त्राची माहिती काढत असतांना पोनि श्री आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत लखन भाऊसाहेब आल्हाट रा. नेवासा हा त्याचे साथीदारासह विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आपले कब्जात बाळगुन ते विक्री करण्याचे उद्देशाने भिस्तबाग महालासमोर, सावेडी परिसरामध्ये येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदर बातमीची हकीगत वरील पोलीस पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत पथकास आदेश दिले.
या पथकाने लागलीच दि. १२ फेब्रूवारी २०२४ रोजी पंचासह भिस्तबाग महाल, सावेडी परिसर या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता १!:३०वाजेचे सुमारास ३ संशयीत इसम भिस्तबाग महालासमोर शाईन मोटारसायकलवर येवुन थांबले. पथकातील अधिकारी व अंमलदार असे संशयीत इसमांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना त्यांना पोलीस आल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांचेकडील मोटारसायकल चालु करुन ते पळुन जाण्याचे तयारीत असतांना दोन इसमांना जागीच पकडले. व एका इसमाचा पाठलाग करुन पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या तिनही इसमांकडे चौकशी करता त्यांनी त्यांची नावे १) लखन भाऊसाहेब आल्हाट (वय 32 वर्षे), रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर, २) लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे रा. मोरया, चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर, ३) अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, १ हजार रुपये किमतीचे २ जिवंत काडतुसे, व ७० हजार रुपये किमतीची विनानंबरची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल असा १ लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. १५४/२०२४ आर्म ऍ़क्ट कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे लखन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, फसवणुक, दुखापत, विनयभंग, अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण – 06 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं 298/2022 भादवि कलम 307, 324, 506,
आर्म ऍ़क्ट 3/25, सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं 352/2021 भादवि कलम 307, 324 आर्म ऍ़क्ट 4/25,सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं 60/2014 आर्म ऍ़क्ट 4/25, सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं 136/2017 भादवि कलम 324, 323, 504, 506, राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं
892/2018 भादवि कलम 420, 406, 34,सातारा खंडोबा, छ. संभाजीनगर
पोलीस स्टेशन गु.र.नं 113/2017 भादवि कलम 354, 325,323
आरोपी नामे लखन सुधाकर सरोदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये फसवणुक व अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे 3 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं 258/2013 भादवि कलम 420, 468, 471, 34, कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं 277/2014 भादवि कलम 420, 465, 467, 468, 469, 471, 34
एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन गु.र.नं
111/2024 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 (फरार)
आरोपी नामे अविनाश विक्रम आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न व चोरी असे गंभीर स्वरुपाचे 2 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन गु.र.नं 26/2016 भादवि कलम 379, 34
सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं 298/2022 भादवि कलम 307, 324, 506, 427, 34 आर्म ऍ़क्ट 3/25 (फरार)
सदरची कारवाई पोलीस अधीक्षकराकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.