Wednesday, February 11, 2026

तब्बल इतक्या पदांवर भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नॅशनल इन्शुरन्समध्ये (National Insurance Company) विविध प्रशासकीय अधिकारी पदांवर भरती करण्यात येत आहे. या भरती अंतर्गत 250 हून अधिक

पदांवर भरती करण्यात येत नॅशनल इन्शुरन्समध्ये विविध प्रशासकीय अधिकारी भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जे उमेदवार NICL AO भरती परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांनी

अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज दाखल करा.नॅशनल इन्शुरन्समध्ये 274 प्रशासकीय अधिकार्‍यांच्या भरतीसाठी घेण्यात येत आहे. सोमवारी 22 जानेवारी हा या अर्ज प्रक्रियेसाठी

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस.नॅशनल इन्शुरन्स प्रशासकीय अधिकारी भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट nationalinsurance.nic.co.in वर अर्ज दाखल करु शकतात. शेवटच्या

क्षणी तांत्रिक समस्या टाळण्यासाठी, उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज दाखल करावा.

डॉक्टर 28

लीगल MBBS 20

वित्त 30

वास्तविक 02

माहिती तंत्रज्ञान 20

ऑटोमोबाईल इंजिनियर्स 20

हिंदी (राजभाषा) अधिकारी 22

नियमित भरती 130

बॅक लॉग 02

NICL AO Recruitment 2024 : अर्ज फी

नॅशनल इन्शुरन्स भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावं लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांसाठी

अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली असून त्यांना फक्त 250 रुपये शुल्क भरावं लागेल.

NICL AO Recruitment 2024 : अर्ज कुठे आणि कसा करायचा?

NICL AO भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला सर्वात आधी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Nationalinsurance.nic.co.in वर जावं लागेल.यानंतर होमपेजवरील करिअर विभागातील सक्रिय लिंकवर क्लिक करा.

उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल.यानंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करा.आता अर्जात योग्य माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!