Saturday, December 21, 2024

खासदार लोंखडेंना इशारा; शिवसेना चोरणाऱ्यांना साथ देणाऱ्या खासदाराला जागा दाखवा’; उद्धव ठाकरेंचं आवाहन

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाऊसाहेब वाकचौरे पक्ष सोडून गेले होते, ते परत आले. त्यांनी शिवसेना चोरली नाही. परंतू सध्याच्या खासदाराने गद्दारी करून

शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली. येणाऱ्या निवडणूकीत त्यांना जागा दाखवा असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

कोपरगाव येथील जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खा. संजय राऊत, मिलींद नार्वेकर, वरूण सरदेसाई, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे,

तालुका प्रमुख बाळासाहेब राहाणे, शहर प्रमुख सनी वाघ आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सकाळी दहा वाजता ही सभेची वेळ नसते. तरीही येवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि उत्स्फुर्त

स्वागत याने मी भारावून गेलो आहे. भाजपवाल्यांनी खासदार, आमदार फोडले पण, त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहेत, हे यावरून सिद्ध होते. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या

निवडणूकीत येथून निवडूण येईल तो शिवसेनेचा उमेदवारच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर बोलतात. मग अशोक चव्हाण घराणेशाहीचे नाहीत का, असा सवाल

करून उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींना आमची घराणेशाही खटकते. हो मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. प्रबोधनकारांचा नातू, शिवसेना प्रमुखांचा पूत्र म्हणून मला किंमत आहे. माझ्या घराण्यावर

प्रेम करणारी जनता आहे. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी साथ दिली नसती तर मोदी आज दिसले नसते, असेही ठाकरे म्हणाले.हक्कासाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना अडविले जात आहे,

पोलिसांकडून लाठ्या-काठ्या, अश्रूधुर सोडला जात आहे. ज्या स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला, त्यांच्या शिफारशी लागु करण्याच्या मागणीसाठीच तर शेतकरी आंदोलन करीत असल्याचे ठाकरे म्हणाले.

देशभक्त म्हणून एकत्र या, जात-पात, धर्म बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र या, कारण येणारी निवडणूक हुकूमशाही विरूद्ध लाेकशाहीची असणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन शिवाजी ठाकरे यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!