Monday, May 27, 2024

१० वीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी:वाढीव गुणांकरिता …

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सध्या महाराष्ट्रात परीक्षेचे वारे सुरू झाले आहे .बारावी बरोबरच दहावीचे ही पेपर लवकरच सुरू होत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे .

त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.इयत्ता दहावीत लोककला, शास्त्रीय कला, चित्रकलेकरिता दिल्या जाणाऱ्या वाढीव गुणांकरिता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करता येतील. मात्र, यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

काही विद्यार्थी व पालक यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे शाळेकडे वेळेत प्रस्ताव दाखल झालेले नाही. त्यामुळे मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने हा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर करून अतिरिक्त गुणांचा लाभ घ्यावा. शाळांनी विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर

करावे, असे आवाहन मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!