माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय सैन्यात दाखल होण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, काही कारणास्तव ज्या तरुणांना सैन्यात भारी होता येत नाही अशा तरुणांसाठी सैन्य भरतीसाठी
अर्ज मागविण्यात आले आहेत. सैनिक भर्ती कार्यालय, मुंबईने 2024 – 25 साठी अधिसूचना जारी केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत ही भरती केली जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड,
नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात कायमचे वास्तव्य असणाऱ्या उमेदवारांकडून हे अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्याच्या तारखा 22 एप्रिल 2024
नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. 13 फेब्रुवारी 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.सैनिक भर्ती कार्यालयाने (मुंबई) यांनी वर्ष 2024-25 करिता अग्निवीर प्रवेश
निवड चाचणीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. भरती वर्ष 2024-25 साठी अग्निवीरांची भर्ती दोन टप्प्यात केली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ऑनलाइन
संगणक आधारित लेखी परीक्षा (ऑनलाइन सीईई तर दुसर टप्पा हा भर्ती मेळावा आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी प्रक्रिया
1. सर्व उमेदवारांनी joinindianarmy.nic.in वर लॉग इन करावे, त्यांची पात्रता स्थिती तपासावी आणि स्वतःचे प्रोफाइल तयार करावे.
2. ऑनलाइन नोंदणीची मुदत (अर्ज सादर करणे) 13 फेब्रुवारी ते 22 मार्च 2024 अशी आहे.
3. अर्जदाराच्या डिजिलॉकर खात्यातून वैयक्तिक तपशील प्राप्त केला जाईल.
4. ऑनलाइन परीक्षेसाठी उमेदवाराला प्रति अर्जदार रु. 250/- परीक्षा शुल्क भरावे लागेल. यासाठी प्रमुख बँकांच्या मेस्ट्रो, मास्टर कार्ड, व्हिसा, रूपे कार्ड्स दोन्ही क्रेडिट आणि डेबिटद्वारे पेमेंट गेटवे सुविधा, एसबीआय आणि इतर बँकांचे इंटरनेट बँकिंग, यूपीआय (भीम) असे पर्याय देण्यात आले आहेत.
5. बनावट, अपूर्ण आणि चुकीचा भरलेला अर्ज नाकारला जाईल. उमेदवारांना संपर्क साधण्यासाठी सक्रिय ईमेल आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.
6. उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी पाच पर्याय देण्यात आले आहेत. यातील पहिल्या तीन निवडींवर आधारित परीक्षा केंद्र देण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील. एकदा परीक्षा केंद्र निवडले तर ते पुन्हा बदलत येणार नाहीत.
7. परीक्षेसाठी विहित तारखेला आणि वेळेवर हजर न राहणाऱ्या उमेदवारांना इतर दिवशी परीक्षेची मुभा दिली जाणार नाही.
8. ऑनलाइन नोंदणी आणि ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांना मुंबईतील सैनिक भर्ती कार्यालयाच्या हेल्पलाइन क्रमांक 022-22153510 वर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सहाय्य केले जाईल.
9. उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार ऑनलाइन सीईई सराव करण्यास सक्षम करण्यासाठी JoinIndianArmy या संकेतस्थळावर श्रेणी निहाय लिंक प्रदान करण्यात आली आहे.
10. “नोंदणी कशी करावी” आणि “ऑनलाइन सीईई साठी कसे उपस्थित राहावे” याचे ॲनिमेटेड व्हिडिओ www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
11. उमेदवारांनी संकेतस्थळावर स्वतःचे अलीकडील छायाचित्रे अपलोड करायचे आहे. अपलोड केलेला फोटो चेहऱ्याशी जुळत नसल्यास उमेदवाराला ऑनलाइन सीईई परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही.
12. उमेदवारांनी प्रवेशपत्राच्या रंगीत प्रिंट आऊटसह परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेच्या ठिकाणी, पडताळणी दरम्यान किंवा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही उमेदवाराची चुकीची माहिती आढळल्यास त्यांना ऑनलाइन परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
13. आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक/वैद्यकीय मानके आणि नोकरीचे तपशील याविषयीचे तपशील उमेदवाराच्या लॉगिन अंतर्गतwww.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध आहेत.