Saturday, December 21, 2024

Paytm च्या ग्राहकांना RBI चा दिलासा, 15 मार्चपर्यंत वाढवली मुदत; जाणून घ्या नियम

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवेची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे पेटीएमला 15 मार्चपर्यंत डिपॉजिट आणि अन्य व्यवहार सुरू ठेवता येतील.

याबाबतची परिपत्रक आरबीआयने शुक्रवारी जारी केले आहे. 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत. तसेच याद्वारे प्रीपेड सेवा, वॉलेट, फास्टॅग आणि इतर सेवांमध्ये पैसे

जमा करता येणार नाही असे 31 जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकात आरबीआयने म्हटले होते.आरबीआयने शुक्रवारी पेटीएमची अंतिम मुदत 15 मार्च पर्यंत वाढवली. जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की,

ग्राहक 15 मार्च 2024 पर्यंत ठेवी, क्रेडिट व्यवहार, प्रीपेड सेवा, वॉलेट, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा वापर करू शकतात. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 च्या कलम 35A अंतर्गत त्याच्या अधिकारांचा

वापर करत वन97 कम्युनिकेशन्सद्वारे संचालित पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर काही व्यावसायिक निर्बंध लादले गेले. पेटीएम ग्राहकांना दुसऱ्या पेमेंट पर्यायांचा विचार करण्याचा तसेच पेटीएम मधील बँक वॉलेट बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

31 जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर प्रमुख व्यावसायिक निर्बंध लादले असल्याची माहिती दिली होती. यात 29 फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी स्वीकारणे आणि क्रेडिट व्यवहार करण्यावर बंदी

घालण्यात आली होती. आरबीआयला पेटीएमच्या केवायसी प्रक्रियेमध्ये मोठी अनियमितता आढळून आली होती. त्यामुळे ग्राहक, ठेवीदार आणि वॉलेट

 

धारकांना जोखमीचा सामना करावा लागला. केंद्रीय बँकेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!