भेंडा.भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोकराव टेकणे यांची शिर्डी लोकसभा अंतर्गत नेवासा विधानसभा किसान मोर्चा संयोजक व समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.
अशोक टेकणे यांनी अनेक वर्षांपासून पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या संघटनात्मक पदावर काम केलेले आहे.त्यांनी नेवासा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस,2014 विधानसभा सहनिवडणुक प्रमुख,
भाजपा तालुका संघटन सरचिटणीस तसेच पक्षाच्या महत्त्वपूर्ण बुथ विस्तार अभियान अंतर्गत नेवासा विधानसभा बुथ विस्तारक म्हणून केलेले काम उल्लेखनीय आहे.या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्याकडे नेवासा विधानसभा संयोजक व समन्वयक
या महत्वपूर्ण पदावर निवड केली त्यांच्या निवडीमुळे जुन्या नव्या निष्ठावान कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले.अशोक टेकणे यांनी तालुक्यातील सर्व जेष्ठ व युवा कार्यकर्ते यांना सोबत घेऊन काम करु असा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या निवडीबद्दल भाजपा किसान
मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा भानुदास बेरड,किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,
उत्तर नगर जिल्ह्याध्यक्ष विठ्ठलराव लंघे व जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पेचे यांनी अभिनंदन केले आहे.