Monday, May 13, 2024

नेवासाफाटा येथे पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्याचा मेळावा 

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा.नेवासा तालुक्यातील नेवासाफाटा निमित्त पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य योजना चा मार्गदर्शन मेळावा सोमवार 19 फेब्रुवारी 2024 सकाळी दहा वाजता यश मंगल कार्यालय नेवासा फाटा येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती विवेक नन्नवरे यांनी दिली आहे.

या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे , भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, प्रदेश सचिव दादासाहेब नन्नवरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, तहसीलदार संजय बिराजदार,

गटविकास अधिकारी संजय लखवाल, बांधकाम कामगार मंडळ कार्यालयीन अधिकारी अमोल गायकवाड , कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष सतिष चव्हाण उपस्थित राहणार आहेत.योजना  सुतार, सोनार, लोहार, चांभार, मिस्त्री, मुर्तीकार, धोबी,

शिंपी, कुंभार, नाभिक, विणकर, चटई झाडू बनविणारे, हार-तुरे तयार करणारे, दोऱ्या वळणारे, होड्या बांधनारे, मासेमारीचे जाळे बनवणारे, कुलूप तयार करणारे, पारंपारिक खेळणी बनविणारे यांना फायदा होणार आहे.या योजनेसाठी करण्यासाठी आधार कार्ड,

बँक पासबुक, रेशन कार्ड लागणार आहे .योजनेचा आपल्याला लाभ पहिला टप्पा : १ लाख रूपये कर्ज ५% व्याज दुसरा टप्पा : २ लाख रूपये कर्ज ५% व्याज मिळणार आहे.नेवासा तालुक्यातील जनतेने या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन विवेक नन्नवरे व अमोल दिघे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!