माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. नुकतेच काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यातच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलण्याची
दाट शक्यता आहे. कारणही तसंच आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेता कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढले आहे.
कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र हे छिंदवाडाच्या पाच दिवसांचा दौरा करणार होते. पण, त्यांनी तो रद्द करुन अचानक दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोघे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
कमलनाथ आणि नकुलनाथ काँग्रेस सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासोबत १० ते १२ आमदार असल्याचंही सांगितलं जातं. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही.
त्यांनी पक्ष सोडला तरी कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत प्रश्न कायम आहे.काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.
या दोन्ही नेत्यांना राज्यसभेची संधी मिळाली आहे.काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ज्यांना भीती वाटत आहे तेच लोक जात आहेत. कमलनाथ यांच्याशी
माझं कालच बोललं झालं आहे. ते छिंदवाडामध्ये आहेत. ते कधीही भाजपमध्ये जाणार नाहीत. ज्या व्यक्तीने नेहरु कुटुंबियांसोबत काम केलं आहे. तो व्यक्ती असं करु शकत नाही, असं ते म्हणाले.
लोकसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधी भाजपमध्ये इनकमिंग सुरु झालीये, तर अनेक बडे नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत.
भाजपने लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कंबर कसली असून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर केला जात आहे.




