Sunday, March 29, 2026

विखेंनी नाव न घेता थोरातावर जोरदार हल्लाबोल म्हणाले तुम्ही काँग्रेसमध्ये राहून रात्री ….

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल, याचा भरोसा नाही. कारण विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीपासून महाराष्ट्रात अनपेक्षित अशा राजकीय घडामोडी घडत आहेत.

विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या घटना घडल्या त्याबाबत कधीच कुणी कल्पना केली नसेल. या घटना सातत्याने सुरुच आहेत. त्यानंतर आगामी काळातही सुरुच राहतील की काय? असा

प्रश्न उपस्थित व्हावा, असे वेगवेगळे दावे केले जात आहेत. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील बडा नेता भाजपात सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारीदेखील मिळाली आहे. या पक्षप्रवेशाबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे

पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असा

टोला विखे पाटलांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना लगावलाय. शिवजयंतीनिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना विखे बोलत होते.बाळासाहेब थोरात यांनी लोणावळ्यात काँग्रेसच्या शिबिरात विखेंवर धंदेवाईक राजकारणी म्हणून टीका केली होती. सत्ता असेपर्यंत ते संबंधित

पक्षात असतात. सत्ता जाण्याची जशीही चाहूल लागते, तसे ते उडी मारतात, असे टोमणे थोरातांनी विखेंना मारले होते. त्यांच्या याच फटकेबाजीला विखेंनी उत्तर दिलंय. अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक

काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असा टोला विखे पाटलांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना लगावलाय.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!