Sunday, December 22, 2024

महाविकास आघाडीचं किती जागांवर एकमत? शरद पवार मोठं विधान..

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती सध्या आहे. अशात महाविकास आघाडी भाजपाच्या विरोधात लढणार आहे. ४८ पैकी किती जागांवर एकमत झालं आहे .

याचं उत्तर आज शरद पवार यांनी दिलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो ४०० पारचा नारा दिला आहे त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा

समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल असंही शरद पवार म्हणाले आहेत. तसंच आजच्या मराठा आरक्षण विधेयकावरही

त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भाजपाने देशात ४०० पारचा आणि महाराष्ट्रात ४० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. याबाबत विचारलं असता मला वाटतं हे खूपच कमी आकडे आहेत. भाजपाने

सगळ्या जागा आम्हीच जिंकू असं म्हटलं पाहिजे असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. तसंच आमची काही खलबतं सुरु आहेत लवकरच आम्ही महाराष्ट्रातल्या जागांवर निर्णय घेऊ. महाविकास आघाडीचं

३९ जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांविषयी आमची उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींशी चर्चा सुरु आहे असंही शरद पवार म्हणाले.शरद पवार म्हणाले, येथे शिवछत्रपतींचा पुतळा होता. तो पुतळा शाहू महाराजांनी बसवला होता.

कालच्या कार्यक्रमाला मालोजीराजे आणि शाहू महाराज येणार होते. मात्र ते येऊ शकले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी मी कोल्हापुरात कार्यक्रमात येणार होतो. त्यावेळी त्यांची भेट घ्यावी, असं मी म्हणालो.

मी ठरवलं की काल त्यांची भेट झाली नाही. तर आज कोल्हापुरात आलो तर भेट घ्यावी.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!