माय महाराष्ट्र न्यूज:श्रीरामपूर येथील लवाद, नगर रचना योजना कार्यालयाचे आता नामाभिदान सहायक संचालक, नगर रचना, श्रीरामपूर शाखा करण्यात आले आहे.
त्यामुळे या कार्यालयाचे कार्यक्षेत्र श्रीरामपूरसह संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा आणि अकोले तालुका निश्चित करण्यात आल्याने त्या त्या तालुक्यातील बिल्डर्स, इंजिनिअर्स आणि जागा मालकांना दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी जारी केला आहे. नगर विकास विभाग शासन निर्णय १० एप्रिल २०२३ अन्वये नगर रचना आणि मूल्यनिर्धारण
संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिनस्त कार्यालयातील विविध संवर्गातील एकूण ११४८ नियमित पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, सदर शासन निर्णयाद्वारे श्रीरामपूर येथील लवाद,
नगर रचना योजना कार्यालयाचे आता नामाभिदान सहायक संचालक, नगर रचना, श्रीरामपूर शाखा करण्यात आले आहे.या कार्यालयास श्रीरामपूरसह संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा आणि अकोले
अंतराने जवळजवळ असल्याने, चिप्रमाणे या तालुक्यातील नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती तसेच महसुली विभागाकडील नगर रचना विषयक चामकाज सहायक सचालक, नगर रचना श्रीरामपूर
शाखा स्त्रयर्यालयाकडून करता येऊ शकेल ही बाब विचारात घेऊन या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नगर विकास विभागाने उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे.
या शासन निर्णयामुळे श्रीरामपूरसह अन्य तालुक्यातील बिल्डर्स, इंजिनिअर्स आणि जागा मालकांनी स्वागत केले आहे. अनिक वर्षांच्या प्रलंबित मागणीला यश आले आहे. आ. लहु कौनडे यांनी या कार्यालयाचा पाठपुरावा केल्याने या कार्यालयास मान्यता मिळाली आहे.
संबंधित कामांसाठी या मंडळींना ले-ऑऊट, इमारत बांधकाम पुखानगी, इमारत पूर्णत्व झाल्याचा दाखला व अन्य संबंधित कामासाठी नगर येथे हेलपाटे मारावे लागत होते. ते आता बंद होणार आहे.