Sunday, December 22, 2024

आयपीएल दोन टप्प्यांत; या कारणांमुळे होणार

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट लीगचा 17 वा हंगाम दोन टप्प्यांत होणार असल्याचे संकेत लीगच्या गव्हर्निंग कॉन्सिलचे अध्यक्ष

अरुण धुमल यांनी दिले. 22 मार्चपासून लीगचा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो, अशी माहिती धुमल यांनी मंगळवारी दिली.हिंदुस्थानात लोकसभा निवडणुका असल्या तरी यंदाची आयपीएल 2024चा हंगाम

मायदेशातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 2009 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे ‘आयपीएल’चे परदेशात आयोजन करण्यात आले होते. 2008 मध्ये सुरू झालेल्या या लीगचे

वेळापत्रक अनेकदा दर पाच वर्षांनी होणाऱ्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांसोबत अडकते. 2009 मध्ये पहिल्यांदाच ही लीग दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती, मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल गव्हर्निंग

कॉन्सिलने आयपीएलच्या 12व्या हंगामाचे मायदेशातच यशस्वी आयोजन केले होते. त्या पार्श्वभूमीवर यावेळीही आयपीएल गव्हर्निंग कॉन्सिलने 17 वा हंगाम हिंदुस्थानातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे सरकारच्या सहकार्यानेच आयपीएलचे वेळापत्रक बनवावे लागणार आहे.एका वृत्तसंस्थेला माहिती देताना अरुण धुमल यांनी सांगितले की, 22 मार्चला ही स्पर्धा सुरू होऊ शकते.

आम्ही सरकारच्या संपर्कात राहून आयपीएलचे वेळापत्रक तयार करत आहोत. ही स्पर्धा मायदेशातच घेण्याचा आमचा निर्धार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!