Saturday, April 26, 2025

आता व्हॉट्सअ‍ॅप डीपीचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही; कंपनीचा मोठा निर्णय

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या डीपफेकच्या मदतीने फसवणूक होण्याचा प्रकार वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करताना खबरदारी घेण्याचं आवाहन कित्येक

तज्ज्ञ करत असतात. आपल्या फोटोंचा गैरवापर होऊ नये यासाठी कित्येक जण व्हॉट्सअ‍ॅप डीपी देखील ठेवत नाहीत. मात्र, आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर येणार आहे, ज्यामुळे यूजर्सना दुसऱ्यांच्या

डीपीचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही.व्हॉट्सअ‍ॅप बीटा इन्फो (WABetainfo) या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. हे फीचर सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉईड बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. लवकरच

हे फीचर सर्वसामान्य यूजर्सना देखील उपलब्ध होईल. यूजर्सच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.व्हॉट्सअ‍ॅप जेव्हा नवीन आलं होतं, तेव्हा यूजर्स एकमेकांचा प्रोफाईल पिक्चर सेव्ह

देखील करु शकत होते. मात्र, 2019 साली कंपनीने हे फीचर बंद केलं. यानंतरही प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीनशॉट काढणं शक्य होतं. मात्र, अशा प्रकारे फोटोंचा गैरवापर होण्याचा धोका असल्यामुळे आता

व्हॉट्सअ‍ॅपने ही सुविधा देखील बंद करण्यासाठी पावलं उचलली आहेत.व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणांर हे नवीन फीचर स्नॅपचॅट किंवा गुगल-पे प्रमाणेच काम करेल. एखाद्या व्यक्तीने डीपीचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न

केल्यास त्याला स्क्रीनवर ‘Can’t take screenshot due to app restrictions’ असा संदेश दिसेल. हे स्क्रीनशॉट ब्लॉक फीचर येत्या काही आठवड्यांमध्ये सर्व यूजर्सना उपलब्ध होईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर प्रोफाईल पिक्चरसाठी विविध सेटिंग्स (WhatsApp Profile Picture Setting) उपलब्ध आहेत. तुमचा डीपी कोण पाहू शकतं यावर तुमचा कंट्रोल रहावा यासाठी या सेटिंग्स दिलेल्या आहेत. यासाठी तुमच्याकडे ‘एव्हरीवन’,

‘माय कॉन्टॅक्ट’, ‘माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट..’ आणि ‘नोबडी’ असे चार पर्याय आहेत.पहिल्या पर्यायामध्ये कोणतीही व्यक्ती तुमचा डीपी पाहू शकते. दुसऱ्या पर्यायमध्ये केवळ तुम्ही ज्यांचे नंबर सेव्ह केले आहेत

त्यांनाच तुमचा डीपी दिसतो. तिसऱ्या पर्यायामध्ये सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्टपैकी काही लोक तुम्ही वगळू शकता. तर शेवटचा पर्याय निवडल्यास कोणालाही तुमचा प्रोफाईल पिक्चर दिसत नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!