Sunday, December 22, 2024

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल या आमदारांने खळबळजनक दावा 

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनिल तटकरे, युगेंद्र पवार यांचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवारांचे सुपुत्र आहेत हे नंतर कळाले. युगेंद्र पवारांची आम्हाला काही अडचण नाही.

मात्र तिकडच्या गटातले बालमित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्यााठी ही सावध घंटा आहे. आपण आता अजितदादा होऊ असं ज्यांना वाटतंय त्यांना रोखण्यासाठी शरद पवारांनी युगेंद्र पवारांना पुढे आणलंय.

त्यामुळे रोहित पवारांनी जास्त हवेत जाऊ नये. त्याशिवाय तटकरे आणि पवार कुटुंबात वितुष्ट आणण्याचं काम मुंब्र्यातून चालतंय. याचा मास्टरमाईंड जितेंद्र आव्हाड आहे असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, घरफोडी करणाऱ्यांपासून शरद पवारांनी सावध राहायला हवे. पवारांनाही असे राजकारण आवडत नाही. पण लोकसभा निवडणुका डोळयासमोर ठेऊन

बारामतीत सुनेत्रा पवारांना महायुती उमेदवारी देणार असेल तर त्यांच्याविरोधात सुप्रिया सुळे लढू द्या. बारामतीकर सुज्ञ आहेत. किंवा रायगडमध्ये सुनील तटकरे आहेत. जनता योग्य उमेदवाराला निवडून देईल. सुनेत्रा पवारांनी बारामतीत भरपूर काम केले आहे.

त्यामुळे कुणी युगेंद्र अथवा जोगेंद्र आले तरी त्याला फार काही फरक पडणार नाही असं त्यांनी म्हटलं. तसेच राष्ट्रवादीचे ४ खासदार आधीपासून आहे. आमची मागणी १० जागांची आहे. १० जागा दिल्या तर निश्चित

आमची ताकद आम्ही दाखवू. लोकसभेत जास्तीत जास्त जागा मागून जिंकायच्या कशा यावर आमचा भर असणार आहे. लोकसभेत निश्चित यावेळी ४ पेक्षा अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिसतील. महायुतीत जितक्या जागा आम्हाला मिळतील

त्या सर्व जागा आम्ही जिंकू असा विश्वास अमोल मिटकरींनी व्यक्त केला. दरम्यान, काँग्रेस आणि शरद पवार गटातील अनेक आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक पक्षप्रवेश दिसतील. काँग्रेसचे ७ आमदार आणि शरद

पवार गटातील ५ आमदार अजित पवारांशी चर्चा करतायेत. काल अजित पवारांच्या बंगल्यावरही शरद पवार गटातील एक महत्त्वाचा नेता भेटीला आला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल.

 

बरेच नेते, आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!