Sunday, May 5, 2024

महिलांनो सावधान! Pills गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य नसल्याचा डॉक्टरांचा दावा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक किशोरवयीन मुली ‘पील्स’ ज्याला आपत्कालीन गोळी म्हटले जाते, त्या परस्पर घेतात. ७२ तासांच्या आत गोळी घेतल्याने प्रेग्नसी

राहत नसल्याचा कंपनी दावा करत असली तरी डॉक्टरांच्या मते, गोळ्यामध्ये हार्मोन (Hormone) बदलविण्याचे स्ट्राँग घटक असल्याने पिल्स डॉक्टरांच्या सल्याशिवाय कधीही घेवू नये. सुरक्षितता पाळण्याचे

सोपे उपाय असताना शरीरावर दुष्परिणाम करणाऱ्या गोळ्या टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.इंटरनेटवर नको असणारी प्रेगन्सी आणि संबंध आलेच तर त्यानंतर केले जाणारे उपाय सर्वात जास्त प्रमाणात सर्च केले जातात.

नको असणारी गर्भधारणेची शक्यता आढळून आल्यास जाहिरात बघून अनेक मुली पील्स घेतात. अनेक अभिनेत्री या पील्सची सर्रास जाहिरात करतात तेव्हा, या पील्सचे महत्त्व अधिक वाढते.

परंतु, जाहिरातीत दावा केल्याप्रमाणे पील्स घेतली आणि आता गर्भधारणा राहणारच नाही याची पूर्णपणे खात्री या कंपन्या कधीच देत नाहीत. पील्स घेण्यासाठी काही निकष असतात.

त्याबद्दल खात्रीशीर माहिती जाणून घेणे गरजेचे असते. परस्पर गोळी घेतल्यानंतर हार्मोन्समध्ये वेगाने बदल व्हायला सुरवात होते.कधी अधिक रक्तप्रवाह होतो तर कधी दोन पाळीच्या मध्ये अचानक रक्त प्रवास

सुरू झाल्याने रूग्णालयात ॲडमिट करण्याची वेळ येवू शकते. पूर्वी पाळीचे वय १२-१४ होते. शिवाय शारिरिक संबंध लग्नानंतर येत असतं. याउलट आता आठव्या-नवव्या वर्षात मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले.

एकदा पाळी यायला लागल्यानंतर भिन्नलिंगी आकर्षण वाढते. इंटरनेट काळातील जनरेशनला प्रत्येक माहिती एका क्लिकवर मिळते पण, ती शहानिशा करण्याचे कष्ट घेतले जात नाही. इंटरनेटवर मिळालेल्या

माहितीच्या आधारे अनेक मुली घरच्यांच्या भितीपोटी कोणाचाही सल्ला न घेता परस्पर पील्स घेतात. बाजारात विविध कंपनीच्या पील्स ६० पासून १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्रत्येक गोळीत असणारा कंटेंट वेगवेगळा असल्याने प्रत्येकीच्या शरीराला तो सूट होत नाही.

ज्या ८० ते ९० टक्के प्रेगन्ंसी राहणार नसल्याचा दावा करतात. अनेकींना असह्य वेदना होऊन रूग्णालय ॲडमिट करायची वेळ येते. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

जाहिरात बघून परस्पर गोळी घेवू नये.गर्भनिरोधक आणि आपत्कालीन दोन वेगळ्या गोष्टी.पील्स घेतल्यानंतर केवळ ८० ते ९० टक्के गर्भधारणा टळते.सोपे उपाय असताना अवघड गोष्टी टाळाव्यात.

डोस चुकला तर गर्भधारणा राहण्याची शक्यता.मासिक पाळीचे वेळापत्रक चुकते.या गोळीचा प्रचंड प्रमाणात गैरफायदा घेतला जात आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!