Saturday, August 30, 2025

दहावी-बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाचा हा इशारा…

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य वेळापत्रकाबाबत चुकीची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे.

तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षांबाबत सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून चुकीची माहिती तसेच अफवा पसरवणाऱ्यांचे प्रकार घडत असतात. या प्रकाराची शिक्षण

मंडळाने आता गंभीर दखल घेतली असून विद्यार्थी-पालकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. प्रश्नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे, परीक्षेच्या आहे.

पसरविणे संबंधित व्यक्तीला गोत्यात आणू शकते. दरवर्षी असे प्रकार घडत असतात याचा मंडळाला नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो. विद्यार्थी-पालकही अफवांवर विश्वास ठेवून मंडळाच्या

हेल्पलाईनवर प्रश्नांचा भडिमार करीत असतात. त्यामुळे त्यांचा अभ्यासाचा बहुमूल्य वेळही वाया जातो. त्यामुळे आता या अफवांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने कडक पावले उचलली असून अफवा

पसरविणा्यांवर शिक्षण मंडळ कायदेशीर कारवाई करणार असल्याचे राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी म्हटले.तसेच विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी

उत्तरपत्रिका पासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. चीफ मॉडरेटर्सनी विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयात उत्तरपत्रिका तपासणीबाबतच्या बैतकीवर बहिष्कार घालत असल्याचे निवेदन  विभागीय

अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रलंबित आणि राज्य सरकारने गेल्या वर्षीं आश्वासन दिलेल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे सांगितले. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेला सुरुवात होते.

चीफ मॉडरेटर्सची बैठक घेऊन उत्तरपत्रिका तपासणीबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातात. मात्र, या बैठकीवरच वहिष्कार घालण्यात आला. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम थांबले आहे. महाराष्ट्र

राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष फाजगे यांच्यासह मुकुंद आंधळकर, लक्ष्मण रोडे, विक्रम काळे, संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे बहिष्कार आंदोलन सुरू आहे.

शिक्षकांनी आंदोलन सुरू केले असले तरी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्यानंतर नियोजित

 

वेळेत उत्तरपत्रिका तपासण्याचे काम आम्ही पूर्ण करू. विद्याथ्यांनी त्यांच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन शिक्षक महासंघाने केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!