माय महाराष्ट्र न्यूज:दुर्बल घटकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) चालवली जात आहे. यामध्ये, 2 लाख रुपयांपर्यंतचा
जीवन विमा वार्षिक 20 रुपयांच्या खर्चावर उपलब्ध केला जात आहे. म्हणजे दरमहा 2 रुपयांपेक्षा कमी. या विमा योजनेत, लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, नॉमिनी किंवा कुटुंबाला 2 लाख रुपये दिले जातात.
यामध्ये विमा खरेदी करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही. जाणून घ्या या योजनेबद्दल सविस्तर माहिती.दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावण्यासारख्या अपघातामुळं
कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यास, 2 लाख रुपये दिले जातील. अपघातामुळे एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावल्यास किंवा कायमचे अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची मदत या योजनेद्वारे दिली जाते.
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. त्याचवेळी, केवळ कमाल 70 वर्षांपर्यंतच्या लोकांनाच या विम्याचा लाभ घेता येईल.विमा संरक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे, जो 1 जून ते 31 मे पर्यंत असणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमार्फत या योजनेअंतर्गत विमा काढता येतो. बँकेच्या कोणत्याही शाखेतून तुम्ही पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. जिथे तुमचे बँक खाते आहे.ऑटो डेबिट
सुविधा उपलब्ध आहे.PMSBY चे लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास, तुम्ही फक्त एकाच बँकेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
दरवर्षी 31 मे रोजी ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे तुमच्या बँक खात्यातून 20 रुपयांचा प्रीमियम कापला जाईल.पॉलिसी नूतनीकरणासाठी खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास, पॉलिसी रद्द केली जाईल.प्रीमियम मिळाल्यावर पॉलिसी पुनर्संचयित केली जाऊ शकते.
PMSBY अंतर्गत नावनोंदणीचा कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे. अपघात झाल्यास 30 दिवसांच्या आत पैशांचा दावा केला पाहिजे.