Sunday, December 22, 2024

मोठी बातमी:५५ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी’ या’ चार देशांमध्ये निर्यातीला केंद्राची परवानगी

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी केली होती.

सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती.याविरोधात शेतकरी, संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करीत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. यापार्श्वभूमीवर चार

दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं ही निर्यात बंदी उठवली. त्यानंतर आज एक महत्वाचा निर्णय जाहीर करत भारतातील जवळपास ५५ हजार टन कांदा परदेशात निर्यातीला परवानगी दिली आहे.

ताज्या माहितीनुसार, केंद्रानं कांदा निर्यातदारांना ५४,७६० टन कांदा बांगलादेश, मॉरिशस, बहारिन आणि भुटान या देशांमध्ये निर्यातीला परवानगी दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार

सिंह यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान, कांदा निर्यातबंदी केल्यानं विविध बाजार समितीत कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळं आपलं मोठं नुकसान होत

असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. यामुळं अखेर केंद्र सरकारला निर्यात बंदी उठवावी लागली, या निर्णयामुळं शेतकरी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.केंद्र सरकारनं कांद्याचे किरकोळ बाजारात वाढलेले

बाजारभाव सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात आणण्यासाठी महागाईचा मुद्दा लक्षात घेऊन ८ डिसेंबर २०२३ रोजी निर्यातबंदी केली होती. ही बंदी ३१ मार्चपर्यंत असेल, असं परकीय व्यापार

महासंचलनालयानं जाहीर केलं होतं. बंदीमुळं कांद्याचे घाऊक बाजारात अगदी वीस ते पंचवीस रुपये प्रतिकिलोने बाजारभाव कोसळले होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!