माय महाराष्ट्र न्यूज:राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
एकीकडे उद्धव ठाकरेंकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरू असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पुर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्ष प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे.
माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र! माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी (Aditya Thackeray) यांच्या शद्बाला काही
किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे,”मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना
नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा
नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा,” असा घणाघाती आरोप शिल्पा बोडके यांनी केला आहे.