माय महाराष्ट्र न्यूज:इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची तारीख अखेर जाहीर झाली. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहेत, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल
नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि आज पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले,
लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल. आयपीएल २६ मे पर्यंत खेळवली जाणार असल्याचे वृत्त आहे. १ जूनपासून वेस्ट इंडिज व अमेरिका येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होणार
आहे आणि भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सलामीचा सामना होईल. चेन्नई सुपर किंग्स ९वेळा आयपीएलचा
उद्घाटनीय सामना खेळणार आहे आणि अन्य फ्रँचायझीमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे. पण, लीगला सुरुवात होण्यापूर्वी गुजरात टायटन्सना मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमीने दुखापतीमुळे आयपीएल
२०२४ मधून माघार घेतली आहे. हार्दिक पांड्या गुजरातकडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आल्याने चाहत्यांना या पर्वाची अधिक उत्सुकता आहे. दिल्ली कॅपिटल्सला त्यांचे पहिले दोन होम सामने विशाखापट्टणम येथे खेळावे लागणार आहे.
IPL 2024 वेळापत्रक
२२ मार्च – चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२३ मार्च – पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
२३ मार्च – कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
२४ मार्च – राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
२४ मार्च – गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२५ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
२६ मार्च – चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२७ मार्च – सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
२८ मार्च – राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
२९ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३० मार्च – लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
३१ मार्च – गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
३१ मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
१ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
२ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
४ एप्रिल – गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
५ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
७ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
७ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ