Sunday, December 22, 2024

भाजपासाठी ३७० जागा जिंकणं अवघड, तर काँग्रेस…”, प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला लोकसभेच्या निकालाचा अंदाज

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाकडून लवकरच या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. दरम्यान,

भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांसह देशभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच निवडणूक रणनीतिकार प्रशांत भूषण यांनी लोकसभा निवडणुकीच्या

निकालाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रशांत किशोर म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १०० जागादेखील जिंकू शकणार नाही. मला काँग्रेसच्या जागांमध्ये फारसा बदल होईल दिसत

नाहीये (२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या). दरम्यान, प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या ‘अब की बार ४०० पार’ या घोषणेलाही फारसा अर्थ नसल्याचं

वक्तव्य केलं आहे. प्रशांत किशोर म्हणाले, भाजपा ३७० जागादेखील जिंकू शकणार नाही.एका वृत्तवाहिनीने प्रशांत किशोर यांना मुलाखतीवेळी विचारलं की, आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना

कोणी आव्हान देऊ शकतं का? यावर प्रशांत किशोर म्हणाले, जी व्यक्ती पाच वर्षे जमिनीवर राहून (ग्राऊंड लेव्हलवर) काम करणार असेल, मेहनत करणार असेल ती व्यक्त मोदींसमोर मोठं आव्हान निर्माण

करू शकते. मोदींना कोणीच पराभूत करू शकत नाही, असल्या भ्रमात कोणीही राहू नका. त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांनीदेखील असल्या अफवा पसरवू नये.प्रशांत किशोर म्हणाले, “मोदींना पराभूत करणं शक्य आहे. गेल्या १० वर्षांमध्ये

मोदींनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी गेल्या १० वर्षांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये लहान-मोठे पराभव पाहिले आहेत.” प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये

‘जनसुराज यात्रा’ काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते बिहारमधील जनतेचं निवडणूक आणि मतदानाबाबत प्रबोधन करत आहेत. प्रशांत किशोर लवकरच अधिकृतपणे बिहारच्या राजकारणात उतरतील असं बोललं जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या वाटचालीबाबत प्रशांत किशोर म्हणाले, ५०-५५ जागा जिंकून तुम्ही या देशाचं राजकारण आणि सत्ताकारण बदलू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेससाठी काही

सकारात्मक गोष्टी घडतील असं मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये काही सकारात्मक बदल होताना मला दिसत नाहीत. मोठा बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेसला किमान १०० जागा तरी जिंकाव्या लागतील.

काँग्रेस १०० च्या आसपास पोहोचण्याची शक्यतादेखील कमीच आहे. सध्याच्या घडीला तरी ते शक्य नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!