Sunday, December 22, 2024

फडणवीसांचं षडयंत्र, शिंदे आणि अजित पवारांचे काही लोकही यामध्ये सामील; जरांगे पाटलांचे गंभीर आरोप

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठा समाजाला (Maratha Reservation) बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे

पाटील यांनी केला आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस करत असून शिंदे आणि अजित पवारांचे लोकही यामध्ये सामील असल्याचं गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. मी टोकाचा

निर्णय घेणार आहे, म्हणून नुसतं घोषणा आणि टाळ्या नको. समाज कोणत्या दिशेला जातो आणि आपण कोणत्या दिशेला हे समजून घ्या, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषेदत हे वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे काय घडलंय हे मला समाजाला सांगायचं आहे. आता ही शेवटची घडी आहे. मी समाजच्या नेत्यांना नेतृत्व म्हणून करतो, मी

सामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी स्वार्थी, लबाड असतो तर येथून मागेच उघडा पडलो असतो. समाजाला नेता मिळाला नाही मिळाला, हे समाजाने ठरवायचं. कोणीतरी मराठ्यांना हरवण्याचं स्वप्न

बघतंय. छत्रपतींच्या समक्ष बसून सांगतो, मी कुठल्याच पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी उद्धव ठाकरे असताना सुद्धा मी त्यांना कडक शब्दात बोललो होतो.सरकार 10 टक्के

आरक्षण दिलं आहे, आपण ओबीसीमधील आरक्षण (OBC Reservation) मागतोय. जे मराठा आणि कुणबी एक असल्याचं सिद्ध झालं. त्यांनीच सांगितलं सरसकट मिळत नाहीय, म्हणून सगेसोयरे शब्द दिला.

हे सर्व एकटा देवेंद्र फडणवीस करतायत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!