Sunday, March 29, 2026

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार जमा होणार

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून सहा

हजार रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Nidhi Yojana) योजनेचा केंद्राचा सोळावा हफ्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताही उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारीला

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे.

त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे.  पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता (डिसेंबर 23 ते मार्च 2024) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ

येथील समारंभात वितरीत होणार आहे. पीएम किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ राज्यातील

सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव

दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.यवतमाळ येथे होणाऱ्या या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी,

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन,

यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!